Aadhar card : आधार कार्ड वरचा फोटो या सोप्या पद्धतीने बदलता येणार…


Aadhar card : आधार कार्ड  वरचा फोटो या सोप्या पद्धतीने बदलता येणार


तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील फोटो सहजरीत्या बदली करू शकता. ते पण सोप्या पद्धतीने.



 आधार कार्ड :
कोणतीही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.त्याचबरोबर बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता लागते. त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्याच आधार कार्डवर आपला एक छोटा आकारात फोटो असतो.
काही जणांच्या आधार कार्ड वर फोटो हा खूप जुना असतो. आणि आपल्या चेहऱ्यात बदल झाल्याने आधार कार्ड वरील फोटो आणि आपला ओरिजनल चेहऱ्या यात खूप फरक दिसतो. पण तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आधार कार्ड वरील फोटो सहजरीत्या बदलू शकता. पुढील स्टेप्स फॉलो करा.


या स्टेप फॉलो करा.


स्टेप नं 1 :
सर्वात सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर uidai.gov.in ची साईड ओपन करून. तेथे तुम्हाला फोटो चेंज ची रिक्वेस्ट टाकावी लागेल किंवा फॉर्म डाऊनलोड करावा लागतो. किंवा तुम्ही हे काम mAdhar हे ॲप मोबाईलमध्ये इंस्टॉल करू शकता.


स्टेप नं 2 :
त्यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून भरा. हा फॉर्म भरण्यास काही अडचणी येत असतील, तर आधार कार्ड केंद्रावर गेल्यावर भरा.


स्टेप नं 3 :
आधार कार्ड केंद्रावर गेल्यावर जो फॉर्म आपण प्रिंट काढून घेतली आहे. तो फॉर्म तेथील व्यक्तीस जमा करावा. त्याच बरोबर काही डॉक्युमेंट सांगितले असतील तर सबमिट करावेत.


स्टेप नं 4 :

इथे तुमचे बायोमेट्रिक पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन केले. आणि आधार कार्ड वरील फोटो बदलला जाईल. दोन ते तीन आठवड्यांनी तुमच्या पत्त्यावर नवीन आधार कार्ड पाठवले जाईल.


Tags